Marathi Ukhane For Newly Married Couple 2024
Marathi Ukhane/ मराठी उखाणे :
तुम्ही मराठी उखाणे शोधत आहात का? तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात इथे तुम्हाला लग्न असो या इतर समारंभ सर्वांसाठी उखाणे मिळतील. उखाणे घ्यायची ही महाराष्ट्रातील गमतीदार व मजेशीर परंपरा आहे.
विविध समारंभात नाव घे म्हणजेच उखाणे घेत असतात विशेषतः लग्न काळात नव वधु व वर या दोघांनाही नातेवाईकांकढून नाव घे म्हणजेच उखाणे घेण्यासाठी आग्रह केला जातो त्यामुळेच जर का तुमचे नुकतेच लग्न ठरले असतील तर आधीच उखाणे जाणून घ्या, चला तर जाणून घेवूया काही सोपे, मजेदार लक्षात राहतील असे उखाणे.
तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी, ___रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा, ___रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा.
चाफा बोलेना, चाफा चालेना, ___च माझ्याशिवाय, पानच हलेना.
गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून, ___रावांचे नाव घेते___ची सून.
संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन, ___रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.
उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त, सगळे म्हणतात___आणि___ची जोडी आहे जबरदस्त.
आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे, ___रावांसाठी, सोडून आले मी सारे.
संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष, ___रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.
नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल, ___रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण, ___रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.
मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार,
___रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.
उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त, सगळे म्हणतात___आणि___ची जोडी आहे जबरदस्त.
संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन, ___रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.
आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार, ___रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार.
संसाराच्या सागरात, प्रेमाच्या लाटा, ___रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा.
स्वप्नातला राजकुमार, आला घोड्यावर बसून, ___रावांचे नाव घेते, त्यांच्याच बाजूला बसून.
Marathi Ukhane for Male (नवरदेवासाठी)
एक होती चिऊ आणि एक होता काऊ,
___च नाव घेतो, डोकं नका खाऊ.
ताजमहाल बनवायला, कारागीर होते कुशल,
___च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल.
आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा,
___च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.
प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा, शोधून नाही सापडणार, ___सारखा हिरा.
click here for https://onlinewish.in/51best-wishes/
हिरव्यागार मैदानात, खेळत होतो क्रिकेट, ___ला पाहून, पडली माझी विकेट.
सोन्याच्या कपावर, चांदीची बशी,
___समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी.फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान, ___च्या रूपाने, झालो मी बेभान.
आंब्याला आहे, फळांच्या राजाचा मान,
___चे नाव घेतो, ऐका देऊन कान.
चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ,
___चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ.
कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव,
___चे नाव घेतो, बंद करा टिव टिव.
डाळीत डाळ, तुरीची डाळ, ___च्या मांडीवर खेळवीन, एक वर्षात बाळ.
उंदीर राहतो, ती जागा असते बीळ, घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ.
एक दिवा, दोन वाती,
___माझी, जीवन साथी.
छोटीशी तुळस, घराच्या दारी,
तूमची___, माझी जबाबदारी.
ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,
___समोर माझ्या, सोण पण लोखंड.
उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,
घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ.
संध्याकाळच्या आकाशाचा, पिवळा-केशरी रंग,
___माझी नेहमी, घरकामात असते दंग.
आंब्याला आहे, फळांच्या राजाचा मान,
___चे नाव घेतो, ऐका देऊन कान.
डाळीत डाळ, तुरीची डाळ,
___च्या मांडीवर खेळवीन, एक वर्षात बाळ.
गृह प्रवेश करतानाचे उखाणे
लग्न झाल्यावर जेव्हा मुलगी सासरी येते तेव्हा उखाणा घेतल्याशिवाय तिला सासरी मंडळी घरात प्रवेश करू देत नाही त्यासाठी तुम्ही अगोदरच उखाणे पाठ करून घ्या. आम्ही घेऊन आलो आहोत गृह प्रवेश उखाणे जे तुम्ही घेऊन गृह प्रवेश करू शकता आणि आपल्या सासरच्या मंडळींना इंप्रेस करा.
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,
___रावांचे नाव घेते साथ जन्मासाठी.
इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात, ___रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते आत.
सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात,
___रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
प्रेमळ लोकांना आवडते, लव्ह शायरी, ___रावांसोबत ओलांडते, मी घराची पायरी.
क्रिकेटच्या मॅच मध्ये, धोनी ने मारली Six,
___ला केलं, मी सात जन्मांसाठी Fix.
शॉपिंगला जायला, तयार होते मी झट्कन,
___चे नाव घेते, तुमच्यासाठी पटकन.
लग्नासाठी Propose करायचं, मी केलं Daring,
आता माझ्या जीवनाचं,___च्याच हातात Steering.
पाहताच___ला, जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.
माझं नाव घेताना___करते Blush, Life मधले Tensions सारे, होणार आता Flush.
माझ्या Life मध्ये,___भेटली Luckily,
कोणी काही बोलले तर, करते माझी वकिली.
ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, ___तू मला, सुपरवूमन वाटतेस.
उखाणा घेते मी, खूपच Easy, ___राव असतात नेहमी, कामामध्ये Busy.
लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा, तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?
रुपेरी सागरावर, चंदेरी लाट, ___रावांचं नाव घेते, सोडा माझी वाट.
लग्न झाले आता, आमची बहरू दे संसारवेल, ___रावांचे नाव घेते, वाजवून ___च्या घराची बेल.
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात, ___रावांचे नाव घेते, ___च्या दारात.
click here to https://courseinmarathi.com/
वरील दिलेले उखाणे घेऊन तुम्ही आपल्या नातेमंडळींना इंप्रेस करा आणि तुमच्या जीवनाच्या नव्या पर्वाला सुरुवात करा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्या.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला वरील दिलेले मराठी उखाणे आवडले असतील, जर का तुम्हाला या व्यतिरिक्त काही उखाणे माहीत असतील तर खाली कंमेंट मध्ये आम्हाला कळवा आम्ही ते या लेखात उपलब्ध करू.
Traditional पारंपरिक उखाणे Marathi Ukhane for Female
तुम्ही Traditional उखाणे शोधात आहात का? तर आम्ही घेऊन आलो आहोत पारंपरिक उखाणे जे कित्येक काळा पासून स्त्रिया वापरत आल्या आहेत तुम्हाला ही उखाणे आवडतील चला तर जाणून घेऊया हि पारंपरिक उखाणे.
Traditional (पारंपरिक उखाणे)
कन्या होते माहेरी, आता सून झाले सासरी, ___रावांसारखे पती मिळाले, भाग्यवान मी खरी.
माहेरी साठवले, मायेची मोती, ___च नाव घेऊन, जोडते नवी नाती.
राजवर्खी बांगडी, मागे पुढे केरवा, ___रावांच्या जीवावर, मी शालू नेसते हिरवा.
नवे घर, नवे लोक, नव नवी नाती, संसार होईल मस्त, ___राव असता सोबती.
लक्ष्मी शोभते दानाने, विद्या शोभते विनयाने, ___रावांच्या जीवावर मी राहते मानाने.
कमळात उभी लक्ष्मी, मोरावरती सरस्वती, ___रावांच नाव घेते खरी मी भाग्यवती.
पाण्याच्या हंड्यावर, फुलाच झाकण, ___रावांच्या हातात, सोन्याचा झाकण.
माझा नमस्कार फुकाचा, तुमचा आशीर्वाद लाख मोलांचा, ___रावांचं नाव घेते, संसार होवो सुखाचा.
चोहोकडे लावल्या चार समया, मधे पसरले आसन, ___राव बसले पूजेला, लक्ष्मी झाली प्रसन्न.
मी होते मळ्यात, चंद्र होता तळ्यात, ___रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधते गळ्यात.
समुद्राला आली भरती, नदीला आला पूर, ___रावांच्या साठी, मी माहेर केले दूर.
आत जाते बाहेर जाते, दुपारचा वाजला एक, ___रावांच नाव घेते, ___ची लेक.
नको मोती, नको चंद्रहार, ___रावांच नाव, हाच मला खरा अलंकार.