marathi ukhane for male romantic
marathi ukhane for male romantic : पुढील लेखामध्ये तुम्हाला सुंदर असे छान रोमँटिक मराठी उखाणे सादर केले आहेत , ते तुम्हाला नक्कीच आवडेल..
पुरुषांसाठी रोमँटिक उखाणे हे आपल्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करून काव्यात्मक, प्रेमळ, आणि अर्थपूर्ण वाक्य रचले जातात. हे उखाणे विशेषतः विवाह समारंभ, सण-उत्सव, आणि खास प्रसंगांमध्ये म्हटले जातात, जेणेकरून आपल्या जोडीदाराबद्दलचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त करता येते. उखाण्यांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करणे हा एक सुंदर आणि रचनात्मक मार्ग आहे
marathi ukhane for male romantic [ मराठी उखाणे ]
1- ISRO ने नवीन शोध लावण्यास, उडवला चंद्रयान,
मी लग्नसाठी खूप मुली पाहिल्या, परंतु Jeevansathi वर भेटली मला माझी _ जान.
2- नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज,
__________ चे नाव घेतो, तिला नजर नको लागो कोणाची आज.
संसार म्हणजे, दोन घरांना जोडणारा पूल,
_______ च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
आठवणींच्या गावात, मी नेहमी रमून जातो,
जेव्हा ____________ च्या हाताचे, मटण वडे खातो.
रस्ता अडवण्यास, जमल्या साऱ्या बहिणी,
______ ला येउद्या घरात, आवडली ना तुमची वहिनी.
मराठा आमची जात, आम्ही ९६ कुळे,
स्वप्नाहून जग सुंदर दिसले, _______ तुझ्यामुळे.
कधी न दिला, डोळ्याला डोळा,
________ चा स्वभाव, अगदी साधा भोळा.
कधी न दिला, डोळ्याला डोळा,
________ चा स्वभाव, अगदी साधा भोळा.
15+ New marathi ukhane for male romantic
आई वडील, भाऊ बहिणी, जणू गोकुळासारखे घर,
______ च्या आगमनाने, पडली त्या सुखात भर.
आयुष्याच्या वळणावर, अडचणी आल्या खूप,
अखेर मन प्रसन्न झाले, _______ चे बघून रूप.
प्रसन्न वदनाने, आले रविराज,
________ ने चढविला संसाराला, स्नेहाचा साज.
तुझ्या सौंदर्याची चढली नशा मला, माझं मन तुझ्या मागे पळतंय,
_______ माझे डोळे दिवस-रात्र, तुझीच वाट बघतंय.
click here to https://onlinewish.in/80-marathi-ukhane-for-marriage/
कुणीतरी माझे होईल, हात घेऊन हाती,
_________ मिठीत घेऊन मोजू चांदण्या, काळोखाच्या राती.
फोटो लावण्यासाठी, बनवली चवकोणी फ्रेम,
माझ्या लाडक्या _________ वर, माझे खरे प्रेम.हळदीने लागला, अंगाला पिवळसर रंग,
__________ माझी नेहमी, घरकामात दंग.
लग्नात लोकांना बसायला, कमी पडल्या खुर्च्या,
_____ आणि_______ ची होउदे गावात चर्चा.
रोमँटिक मराठी उखाणे
घड्याळात आहेत, आकडे बारा,
_____ ला फिरवेन मी, जग सारा.
सुंदर जुन्या आठवणी, ताज्या करायच्या आहेत,
______ तुझ्यासोबत राहून, एक एक स्वप्न पूर्ण करायची आहेत.
शोभून दिसतो मुलींना, मराठमोळा साज,
आणि ______ चे सौदर्य करते, माझ्या मनावर राज.
नाते असावे अतूट, आणि घट्ट,
_______ चे पुरवेन मी, सर्व हट्ट.
Best Marathi Ukhane for Male
marathi ukhane for male romantic
पूर्वे कडून आला वारा, पश्चिमेकडून आला पाऊस,
________ ला लग्नाच्या आधीपासून, साडी नेसण्याची खूप होती हाऊस.
आयुष्यात काही गोष्टी, भेटत नाही सहज,
______मी फक्त तुझा नवरा नाही, तर मला मित्रपण समज.
तू माझी शोना, मी तुझा बाबू,
_______ झाली कायमची, माझ्या संसारात काबू.
लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा,
________ च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.
माझ्या डोळ्यात बघून, ती ओळखते सारे,
_____ सोबत आहे, माझे नाते न्यारे.
वेडा झालो तुझ्या प्रेमात, यात माझा काय गुन्हा,
_____सारखी बायको भेटूदे मला, ७ जन्मी पुन्हा.
विज्ञान युगात माणूस करतोय, निसर्गावर मात,
________ चा अर्धांगिनी म्हणून घेतला, मी माझ्या हातात हात.
रुप्याचे ताट, त्यावर सोन्याचे ठसे,
___________ ला पाहून चंद्र, सूर्य हसे.
आपल्या मनातल बोलायला, धाडस लागत,
त्यासाठी _______ सारख्या मुलीच्या प्रेमात, पडाव लागत.
कपाळावर कुंकू, दिसेल उठून,
सगळे विचारतात, _____येवडी सुंदर बायको भेटली कुटून.
सुट्टी असते मला शनिवार आणि रविवार,
______ ला घातला मी मंगळसूत्र आणि लक्ष्मी हार.श्रीकृष्णाने केला पण, रुक्मिणीलाच वरीन,
__________ च्या सोबत, आदर्श संसार करिन.चला हवा येऊ द्या शो सोडतो, सर्वांना हसवून,
______ ला नेहीन हनीमुनला, विमानामध्ये बसवून.
गुगल वर, काहीही शोधले कि सापडते,
_____ तुझे बोलणे, नेहमी मला आवडते.
सूर्य चंद्राला पाहून, भरती ओटी येते सागराला,
_________ ची जोड मिळाली, माझ्या जीवनाला.
New marathi ukhane
लव वाली फिलिंग, हळू हळू वाढली,
________ राव तुमच्या रूपावर, आज मी भाळली.
कवीची कविता, कवीनेच वाचावी,
________ रावांची प्रेमाची फुले, ओंजळीने वेचावी.
सोशल मीडिया वर आजकाल, काहीही होतय Viral,
__________ रावांच्या घरात, आनंदाने करते मी Arrival.
महादेवाचे वाहन नंदी, गणपती बाप्पाचे वाहन उंदीर,
___________ रावांच्या संसारात बांधेल, प्रेमाचे मंदिर.
लालबागचा गणपती पाहायला, लागतात लांब रांगा,
_____ रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा.
अडचणीच्या वेळी, कामात पडते साठवण,
__________ राव इथे नसले की, येते त्यांची आठवण.
सात जन्माची, साथ देईन तुला,
______ बायको बनवून, तुझ्या घरी न्हे मला.
click here to https://courseinmarathi.com/
देवळात पसरला, अगरबत्तीचा सुगंध,
______ रावांच्या येण्याने, भेटला मला आनंद.
दोन जीवन एक असावे,
______ तुम्ही नेहमी, असेच हसत रहावे.
मेहंदी रंगून आली हातावर,
_____ रावांचे नाव, नेहमी माझ्या होटावर.
माझ्या हातावर तुमच्या नावाचे, अक्षर दिसेल शोभून,
______ तुमचे नाव काढले आहे, आता काढा शोधून.
दाराला लावले, झेंडूच्या फुलाचे तोरण,
______ रावांचे नाव, माझ्या हृदयात कोरण.
बोलताना जिभेचा, जाऊ देऊ नये तोल,
______ रावांच्या प्रेमाइतके, नाही कशाचे मोल.
कळत नाही माझेच मला, स्वप्न आहे कि भास,
________ रावांचे नाव घेते, तुमच्यासाठी खास.
संसाराच्या अंगणात, ऊन पावसाचा खेळ,
____ रावांच्या अन माझ्या संसारी, इंद्रधनुष्याच्या मेळ.शीतल आहे चांदणे, वारा आहे मंद,
_______ रावांना गाण्याचा, भारीच छंद.