marathi ukhane for female/ मराठी उखाणे स्त्रियांसाठी

marathi ukhane for female/ मराठी उखाणे
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

marathi ukhane for female /मराठी उखाणे स्त्रियांसाठी : “लग्न, साखरपुडा आणि इतर खास प्रसंगांसाठी सुंदर आणि पारंपारिक मराठी उखाणे. सांस्कृतिक समृद्धी आणि उत्सवाच्या आनंदाला अधिक खुलवणारे सर्वोत्तम उखाणे शोधा.”मराठी उखाण्यांचा अनमोल संग्रह – लग्न समारंभ, साखरपुडा आणि विविध खास प्रसंगांसाठी योग्य. सांस्कृतिक वारसा आणि परंपरेचा सन्मान करणारे आकर्षक उखाणे.

मराठी उखाणे स्त्रियांसाठी

marathi ukhane for female/ मराठी उखाणे

युक्ती आणि शक्तीची, पुण्याई येथे मोठी,
___ रावांचे नाव घेते, छत्रपती शिवरायांचे नाव नेहमी आमच्या ओठी.

लग्न पळून केले तर, मुलींसाठी बंद होतात माहेरचे दार,
आई बाबानंतर _____________ रावांचाच, भेटला मला आधार.

 ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले,
______________ रावांमध्ये मला, पती परमेश्वर दिसले.

 जोडीदार चांगला असेल तर, सर्वकाही जिंकू,
__________ रावांनी भरला माझ्या, माथ्यावर कुंकू.

पहिल्या पावसामुळे मातीचा, दरवळलाय मधुर सुगंध,
_____________ रावांना बघता क्षणीच, लागला मला छंद.

दूर डोंगरापल्याड, नदीकाठी माझे गाव,
___________ रावांना आवडले फार, म्ह्णून माझ्या नावापुढे त्यांचे लागले नाव.

जीवनसाथीवर पाठवली होती, यांनी रिक्वेस्ट,
परंतु _____________ रावांना केले मी, आयुष्यभरासाठी एकसेप्ट.

यांना मी जीवनसाथी निवडले म्हणून, नातेवाईकांना वाटत होते मी केला मोठा गुन्हा,
पण ________________ राव हवेत मला जोडीदार म्हणून, ७ जन्मी पुन्हा.

दोन जीवांचे, जातक जुळले,
_________ रावांमुळे सुख काय आहे, ते कळले.

आई-वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे,
____________ रावांमुळे आज, दिवस पाहते सुखाचे.

घालते मी शुभप्रभाती, पाणी तुळशीला,
_________ रावांनी मला, बायको करून आणली मुळशीला.

Marathi Ukhane for Girls | मुलींसाठी उखाणे.

प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले,
_________ रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले.

हळद लावण्यासाठी, बसली मी पाटावर,
_____ रावांच नाव काढलंय, मेहंदीने हातावर.

आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे,
______ रावांसाठी, सोडून आले मी सारे.

click here to https://onlinewish.in/marathi-ukhane-for-male-funny/

 मराठी उखाणे

परिवार खुश राहील, जोडून नाती घट्ट,
______ पुरवतील आता, माझा सर्व हट्ट.

 एकविरा आईच्या मंदिरात, नवसाच्या रांगा,
_______ रावांचे नाव घ्यायला, मला केव्हाही सांगा.

आई-वडिलांना काळजी होती, कसे मिळेल घर,
__________ रावांचे नाव घेते, मिळाले शांत वर.

आई-वडिलांना काळजी होती, कसे मिळेल घर,
__________ रावांचे नाव घेते, मिळाले शांत वर.

गेल्या त्या आठवणी , आणि गेले ते दिवस,
______ आज आहे आपल्या आयुष्याचा, सुखाचा दिवस.

click here to https://courseinmarathi.com/

गुलाबाचे फुल छान वाटते, मुलींच्या केसावर,
_______ रावांचे नाव सदैव, माझ्या ओठावर.

 शेवटी आज आला, तो आनंदाचा दिवस,
______ रावांसारखे पती मिळावे म्ह्णून, केला होता नवस.

marathi ukhane list

सोसायटी मध्ये बॅडमिंटन खेळताना, झाली होती सेटिंग,
________ सोबत लग्नाची झाली, माझ्या घरी मीटिंग.

तुमच्या सर्वांच्या साक्षीने, घेतला हातात हात,
________ रावांची लागली मला, सात जन्मासाठी साथ.

दिन दुबळ्यांचे गाऱ्हाणे, परमेश्वराने ऐकावे,
_______ रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागावे.

दिन दुबळ्यांचे गाऱ्हाणे, परमेश्वराने ऐकावे,
_______ रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागावे.

मराठी उखाणे

देवाला भक्त करतो, मनोभारे वंदन,
_________ मुळे झाले, संसाराचे नंदन.

पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले,
________ च नाव घेतल्यावर, चेहरा माझा खुले.

 पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात,
_____ रावांचे नाव घेते ______च्या अंगणात.

click here to https://onlinewish.in/90love-shayari/

नवरीसाठी 50+भरपूर नवीन उखाणे.

तलावात उगवतात सुंदर कमळ,
_____ रावांच नाव घेते, आहेत खूप प्रेमळ.

चला सगळे घरी, संपली आमची वरात,
________ रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते घरात.

कृष्णा ने ठेवले गोकुळ खुश, वाजवून बासुरी,
_______ रावांच नाव घेऊन, आजपासून संसार सुरु सासरी.

कोकणचे समुद्र आहेत, निळे निळे गार,
__________ आहेत माझे, फेव्हरेट स्टार.

 लग्न आटपले, आणि काढली वरात,
________ सगळ्यांसमोर उचलून, न्या मला घरात.

अमरीतसर वरून आणला, हातात घालायला कडा,
________ रावांच्या नावाने भरते, लग्नचुडा.

marathi ukhane for female/ मराठी उखाणे स्त्रियांसाठी

 आकाशातून पडतो, तुटता तारा,
________ मध्ये आहे, माझा जीव सारा.

आई-वडिलांना इंग्लिश मध्ये बोलतात, पप्पा आणि मम्मी,
___________ तुमची साथ हवी, सात जन्मी.

गाव माझे सातारा, आणि जिल्हा आहे कराड,
_________ आपल्या लग्नात, खूप आहे व्हराड.

सर्जेराव पाटलांची, आहे मी लेक,
________ आहेत माझे, एकुलते एक.

भाजीत भाजी, गवाराची,
______ आहेत कदमांचे, आणि मी आहे पवारांची.

 छान वाजवतात , कार्यक्रमात हलगी,
_______ राव आहेत बिझनेसमन, आणि मी शेतकऱ्याची मुलगी.

 काचेच्या वाटीत, गाजराचा हलवा,
________ रावांच नाव घेते, सर्वांना बोलवा.

कोशिंबीर बनवण्यासाठी, कांदे ठेवले कापून,
________ रावंच नाव घेते, सर्वांचा मान राखून.

 मला आवडते, सर्वांची काढायला खोड,
_______ रावांचे बोलणे, मधापेक्षा गोड.

 कोकणाला जाताना, लागतो आंबा घाट,
_______ रावांच नाव घेते, सोडा माझी वाट.

 आकाशात दिसतात, निळे निळे ढग,
_________ सोबत फिरेन मी, संपूर्ण जग.

कोणीतरी आठवण काढत होते, म्हणून मी शिंकले,
_______ रावांचे मन, मी पहिल्या भेटीतच जिंकले.

marathi new ukhane

कोणीतरी आठवण काढत होते, म्हणून मी शिंकले,
_______ रावांचे मन, मी पहिल्या भेटीतच जिंकले.

पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशा आहेत चार,
_______ रावांनी घातला गळ्यात, मंगळसूत्राचा हार.

आई वडील आहेत, मुलांची छाया,
___________ ला आहे, खूप माया.

प्रेमळ लोकांना आवडते, लव्ह शायरी,
______ रावांसोबत ओलांडते, मी घराची पायरी.

चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात स्टार,
_______ रावांचे नाव घेऊन, करते सर्वाना नमस्कार.

शुभमंगल झाले, आणि अक्षता पडल्या माथी,
_______ राव आजपासून, माझे जीवनसाथी.

देवापुढे मागते, सर्वाना चांगले भेटूदे आरोग्य,
_______ रावांच्या रूपात मिळाला, जीवनसाथी योग्य.

एका लग्न समारंभात, झाली आमची भेट,
_______ रावांनी २ महिन्यात, मला बायको बनवून घरी न्हेली थेट.

 कोकणातील जंगले आहेत, सुंदर आणि घनदाट,
________ रावांसोबत बांधली अखेर, लग्नाची जीवनगाठ.

Treading

More Posts