61+happy makar sankranti

61+happy makar sankranti
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

Happy makar sankranti : पौराणिक कथेनुसार विविध कथा सांगितल्या जातात. त्यातील एका कथेनुसार, शंकरासूर नावाच्या राक्षसाचा देवी संक्रांतीने वध केला होता, त्यामुळे या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. तसेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने राक्षस किंकरासुरचा वध केला होता, त्यामुळे या दिवसाला किंक्रात म्हटले जाते.

मकर संक्रांतीचा सण हा दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. यंदा हा सण मंगळवारी साजरा केला जाणार आहे. या काळात पतंग उडवली जाते. तसेत हलव्याचे दागिने, तीळाचे लाडू, सुगड पूजा, रेवडी, भेटवस्तू देणे, शेकोटी पेटवणे आणि इतर मेजवाणी असते. मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना देऊयात खास शुभेच्छा..

61+happy makar sankranti

Happy makar sankranti

मकर संक्रांती २०२५ तिथी

हिंदू पंचांगानुसार १४ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशी सूर्य सकाळी ९ वाजून ३ मिनिटांनी मकर राशीत जाईल. त्यावेळी मकर संक्रांतीच्या सणाला सुरुवात होईल. सूर्याला संक्रमणामुळे मकर संक्रांती सण १४ जानेवारी साजरा होईल.

मकर संक्रांती २०२५ पुण्य काळ

१४ जानेवारी २०२५ रोजी मकर संक्रांतीला ८ तास ४२ मिनिटांचा पुण्यकाळ असणार आहे. तर शुभ काळ हा सकाळी ९ वाजून ३ मिनिटांपासून ते सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असेल.

पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो.
यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

click here to https://onlinewish.in/marathi-charoli-on-life/

गोड नाती गोड सण
तुम्हाला मिळो खूप धन
आनंद ऐश्वर्य सुख समृद्धी
राहो तुमच्या अंगणी
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!

तिळात गूळ मिसळा आणि जिभेवर येऊ द्या गोडवा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गूळ आणि तीळाचा गोडवा,
आकाशात उडणारे उंच उंच पतंग,
या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येवो आनंदाचे तरंग…
हॅपी मकर संक्रांत!

म…… मराठमोळा सण
क…… कणखर बाणा
र …… रंगीबिरंगी तिळगुळ
सं…… संगीतमय वातावरण
क्रा…… क्रांतीची मशाल…
त …… तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

61+happy makar sankranti

काळ्या साडीवर हलव्याचे दागिने खास
आपली नाती जपू हा ठेवा ध्यास,
पूजा करूया नी रचूया सुगडाची रास
एकमेकांवर ठेऊनी विश्वास,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा

कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा

happy makarsankranti wishes in marathi

61+happy makar sankranti

नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते. प्रत्येक प्रातांनुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात संक्रांत, पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती, नेपाळमध्ये माघे संक्रांती, येथे ‘संक्रांती’ म्हणजे ‘हस्तांतरण’ आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात.

तिळात मिसळला गूळ, त्याचा केला लाडू… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

विसरुनी जा दु:ख तुझे हे,
मनालाही दे तू विसावा,
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

तीळ आणि गुळासारखी राहावी
आपली मैत्री घट्ट अन् मधुर
नात्यातील कटुता इथेच संपवा
तिळगूळ घ्या नि गोड गोड बोला!

छोट्यांचे बोरन्हाण,
मोठ्यांची पतंगबाजी
सुवासिनींचे हळदीकुंकू,
सर्व घेऊन आला मकरसंक्रांतीचा उत्साह,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

click here to https://t.me/sagark95

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची
कणभर तीळ, मणभर प्रेम
गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

 जपू तिळाप्रमाणे स्नेह, वाढवू गुळाप्रमाणे गोडवा, निर्माण करू भेद-भावमुक्त समाज प्रेरणा, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा!

मकर संक्रांतीच्या मराठमोळ्या शुभेच्छा

61+happy makar sankranti

 मकर संक्रांतीचा हा पवित्र सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा सूर्य उगवो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

मकर संक्रांतीचा सण तुमच्या घरात तिळाचे लाडू आणि गुळाच्या गोडीने आनंद घेऊन येवो!

 तुमच्या यशाचा पतंग उंचच उंच उडत राहो हीच सदिच्छा!
शुभ मकर संक्रांती, तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!

 नात्यातील कटुता इथेच संपवा… तिळगूळ घ्या नि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

झाले-गेले विसरुनी जाऊ, तिळगूळ खात गोड गोड बोलू..!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या, मकर संक्रांतीच्य गोड गोड शुभेच्छा!

Treading

More Posts