chanakya niti/ चाणक्य नीती

chanakya niti/ चाणक्य नीती

chanakya niti/ चाणक्य नीती :चाणक्य नीती हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे, ज्याची रचना आचार्य चाणक्य यांनी केली आहे. या ग्रंथात नीतिशास्त्र, राजकारण, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र यावर आधारित शिक्षण आणि नीती यांचे संकलन आहे. चाणक्य नीतीत जीवन यशस्वी आणि संतुलित बनवण्यासाठी मौल्यवान सल्ले आणि मार्गदर्शन दिलेले आहे चाणक्य नीती हा चाणक्याने रचलेला अफोरिझमचा संग्रह आहे. हा प्राचीन भारतीय शिक्षक आणि राजकारण्याने दिलेल्या कल्पना आणि विधानांचा एक संच आहे ज्यापैकी बरेच जण या दिवसात आणि युगातही चांगले आणि उत्पादक जीवन कसे जगायचे याबद्दल मौल्यवान टिप्स देतात.या लेखा मधे त्यांच्या अनमोल विचारांचा संग्रह भेटेल.

Chanakya Quotes in Marathi

कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते,
जन्माने नाही.

शिक्षण एक चांगला मित्र आहे.
ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र सन्मान, आदर मिळतो.
तारुण्य आणि सौंदर्य यापेक्षा शिक्षण श्रेष्ठ आहे.

माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे,
पण वाईट माणसाच्या संपूर्ण शरीरात विष आहे.
म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे.

कोणतेही काम सुरु करण्याच्या अगोदर स्वतः ला
नेहमी खालील 3 प्रश्न विचारा…
1) मी हे का करत आहे?
2) याचा काय परिणाम होऊ शकतो?
3) मी या कामामध्ये यशस्वी होईल का?
जर काम करण्याच्या अगोदर या प्रश्नांची उत्तरे मिळाली
तर तुम्ही योग्य मार्गावर आहात
आणि तुमच्या जिंकण्याची शक्यता देखील कैकपटींनी वाढते.

मुर्खांकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षा
शहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते.

जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही,
जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही,
जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाहीत
आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात.

आयुष्यातील तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा :-
1) आनंदात वचन देवु नका.
2) रागामध्ये उत्तर देवू नका.
3) दु: खामध्ये निर्णय घेवू नका.

आयुष्यात कोणतेही काम करायला लाजू नका

आपण आनंदात असणे, हेच आपल्या
शत्रूचे दुःखाचे मूळ कारण असते,
आणि
हीच त्याला सर्वात मोठी शिक्षादेखील असते.

मुर्ख लोकांशी वाद घालू नका
कारण असं केल्याने
आपण आपलाच वेळ वाया घालवतो.

बुद्धीमान व्यक्ती तीच आहे,
जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही,
घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही,
पैशांचा अपव्यय करत नाही,
आयुष्यात मिळालेला धोका, अपमान
आणि मनातील चिंता स्वतः पुरतीच मर्यादित ठेवते.

click here to https://courseinmarathi.com/

शब्द हे पण भोजन आहे,
प्रत्येक शब्दाला स्वतःची चव असते,
बोलण्यापूर्वी तुमचे शब्द चाखून पाहा,
जर तुम्हाला नाही आवडले तर इतरांना ते वाढू नका.

जर नशीबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे
असा विचार करू नका,
काय माहीत तुमच्या नशीबात हेच लिहिले असेल,
प्रयत्न केल्यावरच मिळेल.

क्रोध मूर्खपणापासून सुरु होऊन पश्चातापावर नष्ट होतो.
जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होत.

कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण नका देऊ.
कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे,
त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही
आणि
ज्याला तुमच्यावर विश्वास नाही,
तो तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नाही.

शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते,
आणि मुर्खाला वाटते की ती
त्याला घाबरून शांत बसली आहे.

जसं भय जवळ येईल हल्ला करा
आणि त्याचा नाश करा.

एकदा आपण कोणतेही काम सुरु करता
तेव्हा त्याच्या अपयशाबद्दल घाबरू नका
किंवा त्याचा विचारही करू नका.
जे लोक प्रामाणिकपणे आपले कार्य करतात,
ते सर्वाधिक आनंदी असतात.

भाग्यपण त्यांनाच साथ देते,
ज्यांनी कठीण काळातही
स्वतःच्या ध्येयाची साथ सोडली नाही.

मजबूत मनाला हरवण्याची ताकत
कोणातच नाही.

आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका,
ज्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवू शकत नाही,
त्या दुसरे लोक कसं काय गुप्त ठेवू शकतात.
स्वतःच्या गुप्त गोष्टी दुसऱ्याला सांगण्याची हि सवय तुमच्यासाठी
घातक सिद्ध ठरू शकते.

फुलाचा सुगंध फक्त वातावरणात पसरतो,
पण चांगल्या व्यक्तीचे गुण सर्व दिशांना पसरतात.

आळशी लोकांना ना वर्तमान असतो,
ना भविष्य…

तुमचे जीवन इतके स्वस्त करू नका,
की कोणीही तुमच्या जीवनाचा खेळ करेल.

आचार्य चाणक्य यांचे अनमोल विचार

बुद्धीमान व्यक्ती एक पाय उचलल्यावर
दुसरा स्थिर ठेवतो,
त्याचप्रमाणे पुढचे ठिकाण पाहिल्याशिवाय
पहिले स्थान सोडू नका.

अवास्तव खर्च कुबेरालादेखील कंगाल करेल,
त्यामुळे खर्च मर्यादेत असू द्या.

कोणतीही व्यक्ती प्रमाणापेक्षा अधिक इमानदार
आणि सरळ स्वभावाची असता कामा नये,
कारण, जंगलातील सरळ वृक्ष
आणि समाजातील सरळ व्यक्ती
सर्वात अगोदर कापल्या जातात.

वडिलांच्या संपत्तीवर काय गर्व करायचा,
मजा तर तेव्हा येते,
जेव्हा संपत्ती तुमची असते,
पण गर्व वडिलांना होतो.

प्रेमसंबंध, तुमचे उत्पन्न
आणि तुमची पुढची चाल नेहमी गुप्त ठेवा.

भूतकाळात जे घडले,
त्यामुळे दुःखी होऊ नका.
चिंता आणि बेचैनी सोडून
वर्तमानकाळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी
केला पाहिजे.

नियती तुम्हाला प्रत्येक समस्येमधून
बाहेर पडण्याची संधी देत असते.

ज्ञान सर्वात चांगला मित्र आहे
कारण शिक्षणापुढे तारूण्य आणि
सौंदर्य दोन्ही कमजोर आहेत.

नियती म्हणजे केवळ योगायोग नाही,
ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून
बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते..
बुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो.
सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य
सदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो.
असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत…

जगातील सर्वाधिक बलाढ्य काय असेल,
तर ते म्हणजे,
पुरुषाची विवेकता आणि
महिलेचे सौंदर्य.

ज्यावेळी विनाश जवळ येतो,
त्यावेळी बुद्धी भ्रष्ट होते.

कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते,
कारण ती व्यक्ती अशा वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते,
जिची तुम्ही कल्पनादेखील केलेली नसेल.

संसारात नेहमी एकाच स्त्रीवर प्रेम करा,
जिच्यासोबत तुम्हाला विवाह करायचा आहे.

सुखी जीवनाचे तीन मंत्र…
आनंदात कोणतेही वचन देऊ नका,
रागात कोणाला उत्तर देऊ नका
आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका.

समाधान आणि संयमाने मिळणारा
आनंद दुसऱ्या कशानेही मिळू शकत नाही.

काही गोष्टी या दुसऱ्याच्या चुकांमधून देखील शिका,
स्वतःवर प्रयोग करून जर तुम्ही
प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला
तर संपूर्ण जीवनदेखील तुम्हाला कमी पडेल.

मानवतेपेक्षा कोणताही धर्म श्रेष्ठ नाही.

मीठाप्रमाण कडवट ज्ञान देणारा तुमचा खरा मित्र आहे,
कारण इतिहास साक्षी आहे,
आजवर मीठात कधीच कीडे झालेले नाहीत.

ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा,
जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो,
त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो…
धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात.
अशा लोकांना दुर्बल समजले जाते.
अनावश्यक स्वरुपात या लोकांना त्रास सहन करावा लागतो.

सिंहाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणतीही
सभा आयोजित केली जात नाही,
तो स्वतःच्या पराक्रम आणि गुणाने राजा बनतो.

click here to https://onlinewish.in/60-marathi-suvichar/

प्रेम आणि मैत्री बरोबरीच्या लोकांसोबत करा,
कारण राजाकडे नोकरी करणाऱ्याला सन्मान मिळतो,
व्यवसायिकासोबत व्यवहार योग्य ठरतो
आणि चांगल्या गुणांची स्त्री तिच्या घरात सुरक्षित राहते.

दुधात मिसळलेले पाणी पण दूध बनते,
गुणी व्यक्तीच्या सहवासात दुर्गुणी व्यक्तीपण गुणी होते.

फुलाचा सुगंध केवळ हवेच्या दिशेला पसरतो,
परंतु व्यक्तीचे सद्गुण सर्व दिशांना पसरतात.

या जगात सर्वाधिक भरवशाच काय आहे,
तर ते म्हणजे स्वतःचे मन.

परमेश्वराने आपल्याला दोन डोळे, दोन कान दिले आहेत;
मात्र जीभ एकच आहे.
याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे;
मात्र बोलावे मोजकेच.

अपमानित होऊन जगण्यापेक्षा मेलेलं बर…!
कारण मृत्य तर फक्त काही क्षण दुःख देतात,
मात्र अपमान प्रत्येक दिवशी दुःख देतो.

नोकराची परिक्षा तेव्हा घ्या,
जेव्हा तो काम करत नसेल.
नातेवाईकाची परिक्षा तेव्हा घ्या,
जेव्हा तुमच्यासमोर एखादी समस्या असेल.
त्याचप्रमाणे मित्राची परिक्षा संकटात,
आणि पत्नीची परिक्षा आर्थिक संकटात घ्या.

वाईट व्यक्ती आणि काटे
यापासून वाचण्याचे फक्त दोनच उपाय आहे,
एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका
किंवा त्यांच्यापासून अंतर ठेवा.

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आचार्य चाणक्य यांचे कोट्स आपल्याला नक्कीच आवडतील. आम्ही याठिकाणी अतिशय सुंदर विचार आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. जर आपल्याला हे आवडले असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तीला अवश्य शेअर करा.

जर अजून काही कोट्स तुमच्याकडे असेल तर आपण ते येथे कमेंट करा. आम्ही ते येथे नक्की अपडेट करू.

याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.http://onlinewish.in या ब्लॉगला भेट द्या.

Treading

More Posts