bhaubeej wishes in marathi : भाऊबीजेचा सण हा यम द्वितिया म्हणून देखील ओळखला जाते. भावाला दीर्घायुष्य मिळावं या इच्छेसह बहिणी या दिवशी यम राजाची पूजा करतात. त्याच्या पाशातून आपला भाऊ सुरक्षित राहावा अशी त्यामागील श्रद्धा आहे. अगदीच भाऊ नसल्यास काही मुली चंद्राला आपला भाऊ मानून त्याला ओवाळून पूजा देखील करतात. भाऊबीज हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला साजरा केला जातो. भाऊबीज हा सण दरवर्षी दिवाळीच्या दोन दिवसांनी साजरा केला जातो. भाऊबीजेला बहिण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्या बदल्या भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. भाऊ आणि बहिणीस शुभेच्छा देण्यासाठी भाऊबीज शुभेच्छा संदेश.
बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात सण पवित्र नात्याचा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
“दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा…!!!”