Birthday Wishes For Mami In Marathi :आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात आजोळचे एक वेगळेच स्थान असते. लहानपणच्या अनेक सुंदर गोड आठवणी आपल्या आजोळशी जोडल्या गेल्या असतात. आजोळी गेल्यावर जे आपले लाड होतात ते दुसरीकडे कुठेच होत नाहीत. आपल्या बरोबर लहान होऊन आपल्याशी खेळणारे आजोबा, म्हणू ते चविष्ट पदार्थ करून प्रेमाने खाऊ घालणारी आजी, आईच्याच मायेने सगळं करणारी आपली मावशी, आपले सगळे हट्ट पूर्ण करणारा आपला हक्काचा मामा हे सगळे तर आजोळी असतातच. पण मामाचे लग्न झाल्यावर यात आपले लाड करणारी आणखी एक व्यक्ती येते ती म्हणजे मामी! मामी व भाच्यांचे नाते अगदी खास असते. ती आजीच्या मायेने खाऊ -पिऊ घालते, मावशीच्या मायेने काळजी घेते, आजोबांसारखी पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि मामाच्या बरोबरीने आपले लाड करते. आजी तर आपली खास लाडकी असते.आपण पाठवतो आणि आजीलाही आपले खूप कौतुक असते. पण आजोळी गेल्यावर आपण जिच्याकडून हक्काने लाड करून घेतो त्या मामीलाही आपले खूप कौतुक असते. म्हणून तर ती आपल्या सगळ्या खास दिवशी आपले कोडकौतुक करते. अशा लाडक्या मामीचा वाढदिवस असेल तर आपणही तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले पाहिजे. तुम्हालाही मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday Wishes For Mami In Marathi) पाठवायच्या असतील तर पुढे वाचा. आम्ही तुमच्यासाठी खास मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Happy Birthday Mami In Marathi ) देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश आणले आहेत. यातील काही संदेश तुम्हाला नक्कीच आवडतील. तर मग पाठवा तुमच्या लाडक्या प्रेमळ मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवा…..
मामा आणि मामी म्हणजे असे जवळचे लोक ज्यांच्याकडून आपण हक्काने लाड करून घेऊ शकतो. आजोळी गेल्यावर आपली आईप्रमाणे काळजी रे मामीला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात. पाठवा मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश…
आजच्या दिवशी देवाकडे एकच मागणे आहे की प्रत्येकाला तुझ्यासारखी प्रेमळ मामी मिळावी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मामी!
युनिक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामीला – Unique Happy Birthday Wishes For Mami In Marathi
आपल्यासोबत मजा मस्ती करेल आणि आपल्यासाठी आई – बाबांनाही समजावेल…काहीही झालं तरी मला कायम धीर देणारी अशी माझी मामी, तू माझ्या आयुष्यात आहेस याबद्दल मी देवाची आभारी आहे.
तुझे अस्तित्व म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !तुझा वाढदिवस म्हणजे उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा.. अशा सगळ्या भाच्याच्या लाडक्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
मी ही लवकरच येतोय, माझ्याशिवाय नका साजरा करू तुम्ही तुमचा जन्मदिन, आपणास सुख शांती लाभो हीच प्रार्थना या शुभ दिनी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी!
मामीसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश – Birthday Messages For Mami In Marathi
नाती जपली अन् संपूर्ण कुटुंबास प्रेम दिले, वेळोवेळी आम्हा भाच्यांचे प्रेमाने हट्ट पुरवले. पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा, मामी तुमच्या वाढदिवशी हीच एक सदिच्छा!
तुमच्यासारखी मातृतुल्य प्रेमळ मामी मिळणे ही खरंच परमेश्वराची कृपा आहे.सुखदुःखात स्वतःला कधीही एकट्या समजू नका. कारण प्रत्येक क्षणी आम्ही तुमच्या सोबत आहोत! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी…
तू या जगातील केवळ सर्वात चांगली मामी नाहीस तर माझी चांगली मैत्रीण देखील आहेस. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी!
Latest वाढदिवसाच्या शुभेच्छा मामीसाठी – Latest Birthday Wishes For Mami In Marathi
माझ्या प्रिय आणि आदरणीय मामींना,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य, आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो! तुमच्या आयुष्यात सुखाची बरसात होवो आणि दुःखाचे काळे ढग कधीही तुमच्या आयुष्यात न येवोत हीच परमेश्वराकडे प्रार्थना!
पैशाने भेटवस्तू विकत घेता येतात परंतु मामा- मामीचे प्रेम केवळ नशिबवान लोकांनाच मिळते. मामा -मामीच्या प्रेमाने सगळं बालपण सुगंधित आणि आनंदी होते. माझे बालपण आनंदी करणाऱ्या माझ्या मामीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हॅपी बर्थडे मामी!
नवा सुगंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी हा आनंद शतगुणित व्हावा हीच सदिच्छा! मामी तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा….
चुकले तर कधी रागावतेस ओरडतेस आणि मोठ्या मनाने समजून घेतेस, तर कधी लाड करतेस बाबांसारखा..शिकवतेस प्रेम करतेस आईसारखी.. तुझ्या वाढदिवशी आज ईश्वराला प्रार्थना करतो की सर्वांना मिळो मामी तुझ्यासारखी..हॅपी बर्थडे मामी!
मामी तुमच्या वाढदिवशी देवाकडे एकच प्रार्थना आहे की तुम्ही नेहमी निरोगी राहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..