80+ Marathi Ukhane For Marriage

Marathi Ukhane For Marriage
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
< Group Join Now

80+ Marathi Ukhane For Marriage/मराठी उखाणे खास सणांसाठी : उखाणे हा एक प्रकारचा पारंपरिक मराठी काव्य प्रकार आहे, ज्यामध्ये विशिष्ट नाव घालून एक किंवा दोन ओळींचे सुंदर आणि अर्थपूर्ण वाक्य रचले जाते. हा प्रकार प्रामुख्याने विवाह, मुंज, बारसे, सण-उत्सव अशा शुभ प्रसंगांमध्ये वापरला जातो. उखाण्यांचा उपयोग प्रमुखतः नवविवाहित दांपत्यांनी एकमेकांचे नाव घालून केला जातो

Marathi Ukhane For Marriage

Marathi Ukhane For Marriage
  • कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
    …. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. 
  • यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
    …. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.

कपाळावर कुकु दिसते उठून सगळे विचारतात……..
ऐवढी सुंदर बायको भेटली कुठुन

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,……..
चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. 

मंगळसूत्र हाच सौभाग्याचा दागिना खरा…….
रावाचे नाव घेऊन जपते मराठी परंपरा

ऊबराच्या झाडाखाली दत्ताची सावली……
रावानां जन्म देणारी धन्य ती माऊली

श्री कृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन …….
रावाच्या जीवनात आदर्श संसार करीन

लग्नाच्या सोळयात रुखवत मांडला भारी …….
रावाचे नाव घेते माडवाच्या दारी

आंबा गोड ऊस गोड त्याहीपेक्षा अमृत गोड …….
चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड

काही शब्द येतात ओठातून काही येतात गळ्यातून …….
चं नाव येतं माञ माझ्या ह्रदयातून

हा दिवस आहे आमच्या करिता खास ……….
ला देते गुलाबजामुचा घास

click here to https://onlinewish.in/marathi-ukhane-for-male-romantic/

Marathi Ukhane For Marriage

Marathi Ukhane For Wife | 80+ Marathi Ukhane For Marriage | मराठी उखाणे

मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर,
….रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,
….सारखे पती मिळाले भाग्य म्हणून मानू किती?

सर्वांना नमस्कारा साठी जोडते हो हात,
….रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.

सागराला शोभते निळाईचे झाकण,
….चे नाव घेऊन सोडते कंकण.

लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू,
….रावांना घास देताना,मला येई गोड हसू.

click here to https://onlinewish.in/anniversary-wishes-for-husband/

घास घेण्यासाठी हातात घेतले पुरी श्रीखंड,
…. ना लाभो आयुष्य उदंड.

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,
….राव माझे जीवनसाथी.

आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे,
…. हेच माझे अलंकार खरे.

अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रुपाचा,
….रावाना घास भरवते वरण-भात-तुपाचा.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…. नाव घेते पत्नी या नात्याने.

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,

……… रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती

सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,

……… रावांचे नाव घेते, ……… च्या घरात

महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस

……… राव माझे वृंदावन, मी त्यांची तुळस

Wedding Marathi Ukhane मराठी लग्न उखाणे

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,

……… राव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती

एक तीळ सातजण खाई,

……… रावांना जन्म देणारी धन्य ती आई

साराच्या सारीपाटाची लागली मला चाहूल

……… रावांच्या आयुष्यात मी, आज टाकलं पहिलं पाऊल

चांदीची जोडवी लग्नाची खूण,

……… रावांचे नाव घेते, ……… ची सून

तिरंगी झेंडयाला वंदन करते वाकून,

……… रावांच नाव घेते तुमचा मान राखून

जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज,

……… रावांच नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज

शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात,

……… रावांचे नाव घेऊन टाकते पहिले पाऊल घरात

उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,

……… रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिलं पाऊल

आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश,

……… रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश

नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद,

……… रावांचे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद

साजूक तुपात नाजूक चमचा,

……… रावांचे नाव घेते, आशीर्वाद असु दे तुमचा

साजूक तुपात नाजूक चमचा,

……… रावांचे नाव घेते, आशीर्वाद असु दे तुमचा

नवरदेवासाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for Groom

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,

……… च्या नादाने झालो मी बेभान

तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी,
___रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.

संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष,
___रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.

नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल,
___रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.

सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,
___रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.

मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार,
___रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.

ताजमहाल बनवायला, कारागीर होते कुशल,
___च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल.

सोन्याच्या कपावर, चांदीची बशी,
___समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
___च्या रूपाने, झालो मी बेभान.

शॉपिंगला जायला, तयार होते मी झट्कन,
___चे नाव घेते, तुमच्यासाठी पटकन.

क्रिकेटच्या मॅच मध्ये, धोनी ने मारली Six,
___ला केलं, मी सात जन्मांसाठी Fix.

इंग्रजीत म्हणतात मून,
…. चंं नाव घेते …. ची सून.

click here for https://courseinmarathi.com/

Treading

More Posts