50+Motivational charoli in marathi
50+Motivational charoli in marathi : या प्रेरणादायी कविता वाचून तुमचे मन पुन्हा नव्याने यशासाठी प्रयत्न करण्यास तयार होईल. मनाची समजून काढण्यासाठी, मनाला उभारी देण्यासाठी या मराठी प्रेरणादायी कविता जरूर वाचा.
“चांगली चारोळी” म्हणजे सुंदर आणि अर्थपूर्ण रचना. जीवनाबद्दलची सकारात्मक भावना, प्रेम, मैत्री किंवा इतर भावना व्यक्त करण्यासाठी चारोळीचा उपयोग होतो. खाली काही चांगली मराठी चारोळी उदाहरणे दिली आहेत:
Motivational charoli In Marathi On Life
अत्यंत महागडी,
न परवडणारी खऱ्या अर्थाने
ज्याची हानी भरून येत नाही
अशी गोष्ट किती उरली आहे
याचा हिशोब नसताना आपण जी
वारेमाप उधळतो ती म्हणजे
‘आयुष्य’
सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झाला
click here to https://onlinewish.in/gudi-padwa-wishes-in-hindi-2025/
चालणारे दोन पाय किती विसंगत
एक मागे असतो एक पुढे असतो
पुढच्याला अभिमान नसतो
मागच्याला अपमान नसतो
कारण त्यांना माहीत असतं
क्षणात सारं बदलणार असतं
याचच नाव जीवन असतं
याचच नाव जीवन असतं…
घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो
चांगल्या लोकांची परमेश्वर
खूप परिक्षा घेतो
पण साथ कधीच सोडत नाही
वाईट लोकांना परमेश्वर
खूप काही देतो
पण साथ कधीच देत नाही
वाचणं हे पेरणं असतं
तर लिहिणं म्हणजे उगवणं,
उगवण्याची चिंता करीत
बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा,
एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य
लोक पेरणीसाठी घेऊन जातील.
चारोळी, मराठी कविता , Marathi Poem
गावातले सगळे रस्ते
रात्री गावाबाहेर पडतात
मला घरीच परतायचं असतं
पण ते मला रानात नेउन सोडतात
रात्रीची जागी राहून
रात्रीची जागी राहून
मी त्या चांदनिला बघत होती
ती सुद्धा माझ्याप्रमाणे
एकटीच हसत होती……..
मराठी चारोळ्या
सगळ्यान मध्ये तू असलास तरी
माझ्यासाठी तू ख़ास आहेस ….
माझे कड़क नियम दुसर्यांसाठी
तुला सगळ माफ आहे ……
शहाणं बनण्यापेक्षा मला
वेडं व्हायला आवडेल
तुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावर
विश्वास ठेवायला आवडेल …..
तू क्षितिजासारखा……
जवळ यायला लागलं की लांब राहतोस
आणि यायचं थांबलं की
आशेने पाहतोस
चंद्राबरोबर चांदनी एकच असते
पण तीचं नक्की सांगता येत नाही
त्याला रोज बदलताही येइल पण
तीला ते जमणार नाही